esakal | मोठी बातमी - कोरोनामुळे मुंबईचा दूध पुरवठा होऊ शकतो बंद; जाणून घ्या कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - कोरोनामुळे मुंबईचा दूध पुरवठा होऊ शकतो बंद; जाणून घ्या कारण...

कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघामध्ये ५० टक्के कर्मचारी कामावर

मोठी बातमी - कोरोनामुळे मुंबईचा दूध पुरवठा होऊ शकतो बंद; जाणून घ्या कारण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: भारतासह महाराष्ट्रातही कोरोनानं थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन असणार आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं बंद असणार आहेत तसंच देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र आता मुंबईत दुधाचा पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दूध, फळं आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांना सूट देण्यात येईल. तसंच शहराला फळभाज्या, फळं जे ट्रक वाहतूक करणार आहे त्यांना आधीच परवाने देण्यात येतील. त्यासोबत या वाहनांना पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करण्यात येईल असं सांगितलं होतं. मात्र कोरोना होण्याच्या भीतीमुळे राज्यातले दूध उत्पादन क्षेत्रातले कर्मचारी कामावर येण्यासाठी तयार नाहीयेत. त्यामुळे येत्या काही दिवासांमध्ये दूध पुरवठा बंद होण्याची चिन्हं दिसत आहेत.

मोठी बातमी - आई बाबांच्या आधी 'त्या' अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीने हरवलं कोरोनाला... 

कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघामध्ये ५० टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. मात्र, मुंबईमधले कर्मचारी गावी गेले आहेत. बहुतांश कर्मचारी कोरोनाच्या भीतीमुळे कामावर येण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे मुंबईचा दूध पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. तसंच दुधाची वाहतूक करणारे ड्रायव्हर क्लिनर काम करण्यासाठी तयार नाहीत. मुंबईमध्येही दुधाचे पॅकिंग करणारे कामगार उपलब्ध नाहीत अशी माहिती मिळतेय. त्यात पशुखाद्य कारखान्यातले कामगारही गावाला गेले आहेत त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोल्हापुरातील गोकुळ दूधकडून यावर तोडगा काढण्याचा काम सुरु आहे.  

त्यामुळे आता यावर काही तोडगा निघाला नाही तर मुंबईचा दूध पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे.

due to corona threat mumbai may face milk scarcity in coming days

loading image