Coronavirus: खाजगी कार्यालये, सिनेमागृहांबद्दल ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Uddhav-Thackeray-1
Uddhav-Thackeray-1

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने खाजगी कार्यालये आणि सिनेमागृहांबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजेच ३१ मार्चपर्यंत सर्व खाजगी कार्यालये, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे ही ५० टक्के क्षमतेने चालू ठेवावीत, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री मिळालेल्या माहिनुसार, राज्यात त्या आधीच्या २४ तासात एकूण २५ हजार ८३३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्याबाबत चिंता व्यक्त केली होती. जनतेने कोरोना टाळण्यासाठी सांगितलेल्या अटींचे काटेकोर पालन करावे. मास्कचा वापर करावा आणि सोशल डिन्स्टन्सिंगचे पालन करावे. तसे न केल्यास राज्य शासनाला कठोर निर्बंध लादावे लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता.  त्यानंतरही दररोज कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणारी वाढ पाहता खाजगी कार्यालये, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याशिवाय, या तिन्ही ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर व्यक्तीने मास्क लावलं नसेल, तर त्या व्यक्तिला आत प्रवेश करण्यास मज्जाव केला जाणार आहे.

सिनेमागृहे, नाट्यगृहे यांचा वापर सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी केला जाऊ नये असे निर्देशही नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये देण्यात आले आहेत. कोणत्याही खाजगी कार्यालयांमध्ये किंवा इतर ठिकाणी या सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आलं तर त्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. खाजगी कार्यालयांबाबत कठोर निर्णय घेण्यासोबतच सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांकडूनही अपेक्षित आवश्यक कर्मचारी वर्गाबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कार्यालये आणि निर्मिती (Manufacturing) क्षेत्रातील कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com