मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला

मिलिंद तांबे
Thursday, 18 February 2021

राज्याप्रमाणे मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने चिंता वाढल्याचे दिसते.

मुंबई: राज्याप्रमाणे मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने चिंता वाढल्याचे दिसते. बुधवारी नवीन 721 रुग्णांची भर पडली असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 3 लाख 15 हजार 751 झाली आहे. काल 421 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 97 हजार 522 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत नवे रुग्ण वाढले असले तरी मृत्यू नियंत्रणात असल्याचे दिसते. मुंबईत काल ही मृत्यूंची नीचांकी नोंद झाली असून काल दिवसभरात केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजार 426 इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. रुग्ण दुपटीचा दर कमी होऊन 436 दिवसांवर आला आहे. कोविड रुग्णवाढीचा दर 0.16 इतका आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 30 लाख 58 हजार 146 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत काल मृत झालेल्या सर्व रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी 1 पुरुष तर 2 महिला होती. तीनही मृत रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 61 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 545 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 2 हजार 579 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. बुधवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 397अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 situation mumbai Wednesday recorded 721 fresh cases 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 situation mumbai Wednesday recorded 721 fresh cases