अमेरिका आणि UK प्रमाणे मुंबईतील 'या' दोन रुग्णालयांमध्ये होणार कोरोना लसीची चाचणी

अमेरिका आणि UK प्रमाणे मुंबईतील 'या' दोन रुग्णालयांमध्ये होणार कोरोना लसीची चाचणी

मुंबई : भारतात कोरोना लस लवकरात लवकर येणार याची आशा ज्यांनी सर्व भारतीयांना सर्वात आधी दाखवली त्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीबतात अत्यंत महत्त्वाची बातमी. सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीची मानवी चाचणी पुढल्या आठवड्यात भारतात सुरु होणार आहेत. या लसीचे नाव 'कोविशिल्ड' असं ठेवण्यात आलंय.

पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या चाचणीत देशभरातील दहा सेंटरमध्ये एकूण सोळाशे नागरिकांवर याची चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान सर्व निरोगी नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या लसीच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातून मुंबईतील दोन आणि पुण्यातील एका हॉस्पिटलची निवड झालीये. 

मुंबईत कुठे होणार चाचणी ?

देशभरातून दहा सेंटर्सवर 'कोविशील्ड'ची चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील दोन महत्त्वाच्या कोविड रुग्णालयांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे. या चाचणी होणाऱ्या रुग्णालयांची नावं आहेत KEM आणि नायर रुग्णालय.

या दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १६० - १६० म्हणजेच एकूण ३२० निरोगी नागरिकांवर याची चाचणी केली जाणार आहे. यामध्ये ज्या निरोगी नागरिकांवर ही चाचणी केली जाणार आहे ते स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत.

यामध्ये डॉक्टर्स त्याचसोबत काही आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील ही लस दिली जाणार आहे. आधी UK आणि त्यानंतर ब्राझील आणि अमेरिकेत झालेल्या चाचणीनंतर आता भारतात या लसीची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीनंतर निरोगी नागरिकांवर या लसीचा काय परिणाम झाला याचा अभ्यास केला जाईल.

covid 19 vaccine manufactured by serum institute will conduct human trails in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com