कोविड -19 लसीच्या सुरळीत वितरणासाठी पालिका वापरणार केंद्राचे मोबाइल ऍप 

कोविड -19 लसीच्या सुरळीत वितरणासाठी पालिका वापरणार केंद्राचे मोबाइल ऍप 

मुंबई, 15: मुंबई महानगरपालिका आता कोविड -19 लस वितरण प्रक्रियेस वेगवान व गतिमान करण्यासाठी केंद्राचेच मोबाइल ऍप वापरण्याच्या तयारी आहे. केंद्र सरकारच्या कोव्हिन-20 हेच ऍप मुंबईतही वापरले जाईल. मात्र, मंगळवारी संध्याकाळपर्यंत वेबिनारमध्ये याबाबतची माहीती घेतली गेली. त्यानुसार, भारत सरकारच्याच मोबाइल ऍपचा वापर स्थानिक पातळीवर केला जाईल असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून या ऍपच्या वापरावर पालिकेच्या काही ठराविक व्यक्तींसोबत बैठक सुरू होती. त्यात हे अॅप्लिकेशन कसे वापरायचे? लस घेणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण नाव, पत्ता, त्याची संपूर्ण माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड असे सर्व महत्वपूर्ण कागदपत्र घेऊनच त्या व्यक्तीस लस दिली जाईल. शिवाय, दिलेल्या लसीची माहीतीही त्यात समाविष्ट केली जाईल. पहिल्या डोसचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या डोससाठी याच अॅप्लिकेशनवरुन संबंधित व्यक्तीस एक मेसेज जाईल. तर, पहिल्या डोसनंतर त्या व्यक्तीस काहीही वेगळी लक्षणे आढळून आली तर त्याची ही माहिती अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट केली जाईल. 

एकच व्यक्ती हाताळणार ऍप  

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अॅप्लिकेशन जास्त जणांना हाताळण्याची परवानगी नसेल. काही महत्वाच्या आणि लस देणार्या व्यक्तींनाच हे अॅप्लिकेशन वापरता येईल. शिवाय, लस घेणाऱ्याची कोणतीही माहिती गहाळ किंवा त्याचा गैरवापर होणार नाही याचीही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी, संबंधित लोकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. कोणतेही बदल असल्यास फक्त एकाच व्यक्तीला ते दुरुस्ती करायचे अधिकार असतील. इतर कोणालाही ही माहिती दिसणार नाही. याचे ट्रायल लवकरच सुरू होईल. 

मुंबई महापालिकेच्या स्तरावर आणि स्थानिक पातळीवर हे ऍप वापरणे सोपे होईल यासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.  शुक्रवारी टास्क फोर्सच्या सदस्यांनी घेतलेल्या बैठकीत हे ऍप वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हे ऍप कशापद्धतीने वापरायचे यावर चर्चा आणि बैठका सुरू आहेत. 

“कोव्हिन -20 ऍपचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे कोविड -19  लसीकरण कार्यक्रमावर योग्य पद्धतीने लक्ष केंद्रीत करता यावे आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड राहावा हे आहे. आणि नागरिकांना लसीसाठी अर्ज करण्याची परवानगी मिळण्यासाठीही हे ऍप मदतशीर ठरेल.

लसीकरणासाठी 'ही' माहिती महत्वाची -

रुग्णाचे नाव, त्याचे वय, आधार कार्ड नंबर, तो रुग्ण जिथे हि जाईल तिथे त्याचा आधार कार्ड नंबर टाकला, आधार कार्ड नसेल तर दुसरा कोणतेही शासन अधिकृत ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, वाहनचालक परवाना नंबर टाकला की त्याला कोणत्या कंपनीची लस दिली गेली आहे त्याची माहिती मिळेल. त्याला अजून कोणती लक्षण होती ते देखील समजेल. तो पुन्हा दवाखान्यात आला की नाही आला ते देखील समजेल. तसेच पुढील लस घेण्याची तारीख कोणती आहे? हे WhatsApp मेसेजद्वारे समजेल कि तुमचा डोस दिला गेला आहे आणि पुढील डोस घेण्यासाठी कुठे जावं लागणार आहे. तसेच कोणती लस दिली आहे याची नोंद त्यात होईल. पिनकोडचा वापर त्यात केला जाईल. उदाहरणार्थ लसीकरणासाठी नायरच्या 10 सेंटर पैकी एक सेंटर दिले असेल त्या सेंटरवर जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर सांगितला की तिथे सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, असेही काकाणी यांनी सांगितले.

for flaw less distribution of corona vaccine BMC to use mobile application of central government 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com