esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारागृहांमध्ये कोविड केअर सेंटर

बोलून बातमी शोधा

jail

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारागृहांमध्ये कोविड केअर सेंटर

sakal_logo
By
अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या सुरक्षेसाठी कारागृह विभागाने दोन टिअर सुरक्षा उपाययोजना करण्याची रणनीती आखली आहे. त्या अंतर्गत कारागृहामध्ये विलगीकरणासह स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचे कामही हाती घेतले आहे.

अतिरिक्त महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांना राज्यातील सर्व कारागृहांच्या अधिक्षकांना कारागृहामध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याशिवाय राज्यातील कारागृहांमध्ये 24 विलगीकरण केंद्रही सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार आता कारागृहांमध्ये एखादा कैदी दाखल झाल्यास त्याला 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. तेथे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येते. कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याला कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. लक्षणे नसल्यास त्याला कारागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे. पण या नव्या उपाययोजनाच्या माध्यमातून संशयित आणि लागण झालेल्या कैद्यांना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवणे शक्य होणार आहे.

राज्यातील 44 तुरुंगात आतापर्यंत तुरूंग प्राधिकरणाकडून 65 हजार 340 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एप्रिल 2020 पासून एकूण 3444 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि सात जणांचा त्यात मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील कारागृहांमध्ये 274 सक्रिय रुग्ण आहेत. त्यात कोल्हापूर (43), कल्याण (43), ठाणे (25) आणि आर्थररोड कारागृहात (23) सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात यश

25 मार्चपासून तुरूंगात जास्त गर्दी होऊ नये म्हणून एकूण 10 हजार 788 कैद्यांना सोडण्यात आले आहे. सध्या राज्य कारागृहात 34 हजार 422 कैदी आहेत. कारागृह प्रशासन देखील तुरूंगातील कर्मचार्‍यांमध्ये व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत कर्मचार्‍यांवर 4 हजार 103 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात 822 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 9 कर्मचारी कोरोनाची लढाई हरले, तर 691 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या राज्य कारागृहात 122 सक्रिय कोविड पॉझिटिव्ह कर्मचारी आहेत. राज्यातील कारागृहांमधील 3818 कर्मचाऱ्यांपैकी 3207 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

(संपादन- पूजा विचारे)

covid care center in prisons for second wave of corona virus