esakal | पालिकेकडून दादरमध्‍ये 20 रुग्‍णशय्येचे 'कोविड एचडीयू' रुग्‍णालय

बोलून बातमी शोधा

BMC-Office

पालिकेकडून 20 रुग्‍णशय्येचे 'Covid HDU' रुग्‍णालय

sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये मुंबई महानगरपालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाने 20 रुग्‍णशय्या क्षमतेचे 'कोविड एचडीयू' (हाय ड‍िपेन्‍डन्‍सी युनिट) रुग्‍णालय उभारले आहे. अल्‍पावधीत उभारण्‍यात आलेल्‍या सदर रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन हिंदुजा रुग्‍णालयाकडून केले जाणार आहे. रुग्‍णालयासाठी संयंत्र, ऑक्सिजन पुरवठा, पाणी, वीज, सुरक्षा इत्‍यादी व्‍यवस्‍था महानगरपालिका पुरवणार आहे. तर हिंदुजा रुग्‍णालयाकडून वैद्यकीय तज्‍ज्ञ, परिचारिका, इतर मनुष्‍यबळ तसेच रुग्‍णांसाठी कपडे, अन्‍न, औषधी इत्‍यादी बाबी द‍िल्‍या जाणार आहेत.

जी उत्तर मधील एकूण रुग्ण - 24 हजार 279

बरे झालेले रुग्ण - 18 हजार 208

एकूण उपचाराधिन रुग्ण - 2078

एकूण मृत्यू - 720

व्हॅक्सीनेशनवर भर

धारावीत लसीकरणाला नागरिकांचा फारसा प्रतिसाद नाही. तरी देखील पालिकेच्या माध्यमातून लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. सुरुवातीला दिवसभरात 50 नागरिक देखील लसीकरण करण्यास तयार होत नव्हते. आता दैनंदिन लसीकरणाचा आकडा 500 च्या वर गेला असून आतापर्यंत 11 हजार 160 लाभार्थींचे लसीकरण झाले.

हेही वाचा: 'या' दोन विभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांच्या वर

दुसरी लाट थोपवण्यासाठी 'धारावी पॅटर्न' वर काम सुरूच ठेवले. कामगार वस्ती मोठी असल्याने आम्ही घराघरात चाचण्या सुरू केल्या. लोकांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था केली. जनजागृतीसह लसीकरण मोहीम देखील राबवली. रुग्णवाढ तसेच मृत्यूदर नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप तळलेला नसून सर्वांनीच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

किरण दिघावकर , सहाय्यक आयुक्त

(संपादन- पूजा विचारे)

covid hdu hospital with 20 beds in dadar