esakal | 'या' दोन विभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांच्या वर

बोलून बातमी शोधा

Corona Virus
'या' दोन विभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांच्या वर
sakal_logo
By
मिलिंद तांबेः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोना संसर्ग वाढत असून मुंबईतील आर उत्तर आणि डी विभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.70 % आहे. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील कोरोना संसर्ग नियंत्रणात होता. सर्व विभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांच्या खाली आला होता. मात्र आता दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात रुग्णवाढीचा दर वाढल्याचे दिसते.

मुंबईतील 24 विभागांपैकी आर उत्तर आणि डी विभागात रुग्णवाढीचा दर वाढला आहे. आर उत्तर दहिसरमध्ये रुग्णवाढीचा दर 1.08 तर डी ग्रांट रोड विभागात रुग्णवाढीचा दर 1.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. आर उत्तर मधील एकूण रुग्णसंख्या 18 हजार 667 तर डी विभागातील एकूण रुग्णसंख्या 29 हजार 677 एवढी आहे. आर उत्तर मधील रुग्ण दुपटीचा दर 65 दिवसांवर तर डी विभागातील रुग्ण दुपटीचा दर 78 दिवसांवर गेला आहे. आर उत्तरमध्ये एकूण 127 बेड्सची व्यवस्था असून त्यातील 81 टक्के बेड भरले असून केवळ 19 टक्के बेड रिक्त आहेत. तर डी विभागातील 207 बेडची व्यवस्था असून त्यातील सर्व 100 टक्के बेड भरले आहेत.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा उच्चांक

मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात असली तरी मृतांचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. सलग तिसऱ्या दिवशी मृतांनी उच्चांक गाठला आहे. दिवसभरात 90 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 251  वर पोहोचला आहे. शनिवारी मृत झालेल्यापैकी 53 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 57 पुरुष तर 33 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 9 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  31 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 50 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. 

काल 3 हजार 908 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6,52,532 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 59 हजार 318 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.70 पर्यंत खाली आला आहे.

हेही वाचा: १८ वर्षावरील लसीकरण; पहिल्या दिवसाचं उद्दिष्ट पूर्ण, 992 जणांनी घेतली लस

मुंबईत कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 54,61,605 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.70 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 96 दिवसांवर आला आहे. मुंबईत गुरुवारी 5900 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5,78,331 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 59,318 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

(संपादन- पूजा विचारे)

growth rate in the two divisions of mumbai above one percentage