पनवेलकरांना मोठा दिलासा; सिडकोतर्फे उभारण्यात येणार कोव्हिड रुग्णालय... 'इतक्या' कोटींचा निधी झाला मंजूर

दीपक घरात
शुक्रवार, 31 जुलै 2020

सिडकोतर्फे पनवेलमध्ये लवकरच 200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या सर्व सोईयुक्त रुग्णालयासाठी सिडकोकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

पनवेल : सिडकोतर्फे पनवेलमध्ये लवकरच 200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या सर्व सोईयुक्त रुग्णालयासाठी सिडकोकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिडकोतर्फे मंजूर केलेले हे रुग्णालय कशा पद्धतीचे आणि तेथे कोणत्या सुविधा असाव्यात, यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता. 30) माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. 

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन; रिया चक्रवर्तीच्या वडिलांच्या नावावर घर

या वेळी झालेल्या बैठकीत पनवेलमधील मंजूर झालेल्या कोव्हिड रुग्णालयासंदर्भात चर्चा करण्यात आली. या रुग्णालयात 200 खाटा असून, त्यात 150 सर्वसाधारण, तर 50 विशेष खाटा असतील. त्याचप्रमाणे रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था; तसेच तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, स्टाफ किती असावा, रुग्णालय उच्च दर्जाचे असावे, याबाबत चर्चा करण्यात आली. या विभागात सिडकोने केवळ कोव्हिडचा विचार न करता एम्सच्या धर्तीवर उरण, पनवेल परिसरातील नागरिकांसाठी कायमस्वरूपी सुसज्ज रुग्णालय निर्माण करावे, अशी भूमिकाही या वेळी मांडण्यात आली. 

महापौरांनी केली नायर रुग्णालयाची पाहणी; कोरोनाबाधितांशीही साधला संवाद...

बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील, समितीचे सचिव महेंद्र घरत, श्री साई देवस्थानचे विश्वस्त रवींद्र पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिरीष गुणे आणि त्यांचे सहकारी आणि सिडको अधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Hospital to be set up by CIDCO in panvel ... So many crores of funds have been sanctioned