मोठा निर्णय : गणेशेत्सवाच्या अगदी आदल्या दिवशीही ST ने कोकणात जाता येणार, अट मात्र एकच....

मोठा निर्णय : गणेशेत्सवाच्या अगदी आदल्या दिवशीही ST ने कोकणात जाता येणार, अट मात्र एकच....

मुंबई : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशात मुंबईतून खास गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जात असतात. गौरी गणपती उत्सवासाठी राज्य सरकारने 6 ऑगस्ट पासून एसटीची सेवा सुरू केली आहे. दरम्यान 12 ऑगस्टपर्यंत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

12 तारखेनंतर म्हणजेच 13 ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आधी कोरोनाची चाचणी करावी लागणार असून, तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास चाकरमान्यांना गावी जाता येणार आहे. त्यामुळे आता 21 ऑगस्टपर्यंत एसटीची सेवा सुरू राहणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. कोकणात जाण्याकरिता 13 ते 21 ऑगस्ट अखेर एसटी बसेस उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी चाकरमान्यांना प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - 19 ची चाचणी  करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह  असल्यास त्यांना कोकणासाठी प्रवास करता येणार आहे. 

6 ऑगस्टपासून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरु केल्या आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून आज अखेर तब्बल 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. योग्यरीत्या सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या आहेत.

दरम्यान कोविड-19 साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी व नैसर्गिविधी साठी वाहने थांबविण्याची दक्षता महामंडळाने घेतली असून प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या बसेस सोमवारी रात्री पासून  आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहे.  आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड - 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच प्रवासासाठी  स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही. असे महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

covid rt pcr test compulsory for people who are going to konkan after 13th august

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com