मध्य, पश्चिम रेल्वेच्या टर्मिनस स्थानकावर कोविड चाचणीस सुरूवात

प्रशांत कांबळे
Wednesday, 25 November 2020

प्रवाशांची थर्मल तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर प्रवासी पॉझिटिव्ह निघाल्यास सरळ कोविड केंद्रातच रवानगी केली जात आहे.

मुंबई: राज्याबाहेरून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या रेल्वे आणि विमान प्रवाशांची कोविड तपासणी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्रवाशांची थर्मल तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर प्रवासी पॉझिटिव्ह निघाल्यास सरळ कोविड केंद्रातच रवानगी केली जात आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या टर्मिनस स्थानकावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान प्रवाशाला लक्षणे आढळल्यास प्रवाशांना कोविड सेंटर मध्ये पाठवल्या जात आहे. तर कोरोनाची बाधा नसल्यास प्रवाशांना काही दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे.

अधिक वाचा-  सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनेवर IAS अधिकाऱ्यांचाच डल्ला, मुलांना पाठवलं परदेशात

सध्या सीएसएमटी, पनवेल, दादर, एलटीटी, वांद्रे, बोरिवली, मुंबई सेंट्रल, कुर्ला यासह इतर टर्मिनस स्थानकावर ही तपासणी केली जात आहे. स्थानकावरील तपासणीचे पैसे प्रवाशांकडूनच घेतले जात आहे.

अधिक वाचा-  प्रताप सरनाईक मुंबईबाहेरुन आल्यानं क्वारंटाईन, ईडीला विनंती पत्र सादर करणार

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आपल्यासोबत बाळगण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत.  याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले होते.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid test begins at Central Western Railway terminus station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid test begins at Central Western Railway terminus station