सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनेवर IAS अधिकाऱ्यांचाच डल्ला, मुलांना पाठवलं परदेशात

सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनेवर IAS अधिकाऱ्यांचाच डल्ला, मुलांना पाठवलं परदेशात

मुंबईः  सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांवर अधिकाऱ्यांनीच डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. दोन आयएएस अधिकाऱ्यांनी सामान्यांच्या योजनेचा लाभ घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सामान्यांसाठी असणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत कशा पोहोचणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ IAS अधिकाऱ्यांनी आपल्याच मुलांना मिळवून दिला आहे. यात दोन आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. श्याम तागडे आणि मिलिंद शंभरकर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. 

या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांनाच सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीचा फायदा करुन दिला आहे. श्याम तागडे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत. त्यांचा मुलगा आरुष तागडे याला त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती अंतर्गत ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला. तर मिलिंद शंभरकर या अधिकाऱ्यानं आपली मुलगी गाथा हिला अमेरिकेतल्या विद्यापीठात याच योजनेचा फायदा मिळवून दिलाय.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी श्याम तागडे यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, शिष्यवृत्तीबाबत नियमानुसार प्रक्रिया झाली आहे. माझ्या मुलाने जुलै महिन्यातच अर्ज केला होता. माझी पोस्टिंग खात्यात ऑगस्टमध्ये झाली आहे. मी याबाबत मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील सांगितलं होतं. त्यामुळे या निवड प्रक्रियेत मी नव्हतो, असं तागडे यांनी सांगितलं आहे.

अनुसूचित जातीतील गरीब मुला मुलींसाठी असलेल्या योजनेचा लाभ अधिकारीच घेत असल्याचा पुन्हा एकदा समोर उघड झालं आहे. याआधी फडणवीस सरकारच्या कार्यकालात तत्कालीन सचिव दिनेश वाघमारे आणि सहसचिव दिनेश डिंगळे यांनी आपल्या मुलांना फायदा मिळवून दिला होता.  तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही आपल्या नातेवाईकाला लाभ मिळवून दिला होता.

Two ias officers misused scheme benefit own children study abroad under scholarships

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com