मुंबई पालिकेच्या  तिसऱ्या टप्प्यातील कोविड लसीकरणाला सुरुवात कधी?, जाणून घ्या

मुंबई पालिकेच्या  तिसऱ्या टप्प्यातील कोविड लसीकरणाला सुरुवात कधी?, जाणून घ्या

मुंबई: येत्या मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी पालिकेकडून करण्यात आली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून नोंदणी सुरू केली जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यातील नोंदणी मुंबईत मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. सर्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा डेटा पालिका आधी गोळा करणार असून त्यानंतर ते नोंदणीची तारीख जाहीर करतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक प्रशासन ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सर्वेक्षणात त्यांनी गोळा केलेला सर्व डेटा एकत्रित करण्याचे नियोजन केले होते. तोपर्यंत त्यांनी नोंदणीची तारीख जाहीर केलेली नव्हती. आताही आधी हा डेटा गोळा केला जाईल. काही दिवसांत नोंदणीची तारीख जाहिर केली जाईल.

“आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांबाबतची सर्व माहिती आहे. मात्र तिसर्‍या टप्प्यात कोण लाभार्थी म्हणून पात्र ठरू शकेल हे आम्ही ठरवणार आहोत. शिवाय, तिसऱ्या टप्प्यातील नोंदणी सुरू होण्यापूर्वी आम्ही सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आपापल्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची माहिती सादर करण्यास सांगितले आहे.

काकणी पुढे म्हणाले की, त्यांनी लसीकरण मोहिमेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश प्रत्येक वॉर्डला दिले आहेत. जर सरकारने तिसऱ्या टप्प्यासाठी नागरिकांची नोंदणी करण्यास परवानगी दिली तर 15 दिवसांच्या आत मुंबईत लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण होईल. नोंदणी सुरू करण्यापूर्वी आम्ही केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वांची अपेक्षा करत आहोत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात नोंदणी कदाचित सुरू होईल.”

राज्याच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की वयाच्या निकषांनुसार लाभार्थ्यांचा डेटा वापरतील. “आम्ही 50 पेक्षा कमी वयोगटातील रुग्णांसाठी ज्यांना इतर सहव्याधी आहेत त्यांच्यासाठी आमच्या सर्वेक्षणाचा वापर करणार आहोत. आमच्याकडे काही सह व्याधी असणाऱ्या नागरिकांचा अहवाल आहे. मात्र हे आम्हाला याची खात्री नाही की केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये त्यापैकी किती जण बसतील.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid Vaccination Third phase started March Registration senior citizens starts from first week

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com