दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे वर्ग बंदच, ऑनलाईन शिक्षणावर भर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे वर्ग बंदच, ऑनलाईन शिक्षणावर भर

मुंबई: मुंबई आणि परिसरात मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने दहावीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलण्याच्या प्रक्रियेला खीळ बसणार आहे. कोणाचीही वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगत शाळांनी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये न बोलावता ऑनलाईन शिक्षणच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि परिसरात मागील आठवडाभरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालकांकडून आम्हाला काही सूचना आल्या आहेत. शिवाय विद्यार्थी शिक्षक यांच्या आरोग्याची हित लक्षात घेऊन आम्ही यापुढे विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात नाही. त्यांना घरूनच ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करू असा निर्णय घेतला असल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने मुंबईतील काही मोजक्या शाळांनी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलावून दहावीच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यास सोबतच इतर काही त्यांच्या अभ्यासातील त्रुटी आणि कमतरता दूर केल्या जात होत्या. तर काही विषय कठीण असल्यास त्यावर मर्यादेत वेळेतच शिकवण्या घेतल्या जात होत्या. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे प्रश्नही सुटत होते. यासाठी मागील आठवड्यांपूर्वी  मुंबई आणि परिसरातील शाळामध्ये  शिक्षकांनी प्रत्येक वेळी दहा-दहा अशा टप्प्याने विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना मार्गदर्शन केले जात होते. आता कोरोनाची संख्या वाढत असल्याने तूर्तास आम्ही याविषयीची खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रेडीज यांनी दिली. आतापर्यंत सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणावर यापुढे भर दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबई-ठाणे परिसरात मागील आठवड्यात वाढलेली  कोरोनाची संख्या ही चिंताजनक आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन सुरू केले आहे. शिवाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कोणत्याही प्रकारच्या शाळा सुरू करण्यासाठी सरकारने घाई करू नये, अशी आम्ही सरकारला विनंती सुद्धा केली आहे असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी दिली.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Schools decided for 10th students continue online education without reopen classroom

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com