esakal | 45 वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण आज बंद!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

45 वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण आज बंद!

sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे पालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवार (3 मे) रोजी 45 वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण बंद राहणार आहे. तर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे निर्देशित 5 केंद्रांवर सुरू राहील. ज्यांची कोविन अँपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत, कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी मुंबईत, पालिका, शासन यांच्यातर्फे 63 केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 कोविड-19 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होवू शकणार नाही. दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील 500 नागरिकांचे लसीकरण पालिकेच्या 5 केंद्रावर करण्यात येणार आहे.

ही 5 लसीकरण केंद्रे राहणार सुरु :

1. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

संपादन : शर्वरी जोशी

loading image