लॉकडाऊनमध्ये आता बिनधास्त मागवा हॉटेलातील चमचमीत पदार्थ; अजित पवारांनीच दिलीये माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या खाआणि ऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील.

मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या सर्वांना प्रशासनाकडून घरात राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. आपण जोपर्यंत घराबाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला कोरोना स्पर्श देखील करू शकत नाही. अशात आपलं बाहेर पडणं, मॉल मध्ये फिरणं, हॉटेलात जाऊन चमचमीत पदार्थ खाणं.  पण आता काजळी नाही, कारण जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

Covid19 : डोंबिवलीत आणखी एक कोरोना रुग्ण; लग्नात हजेरी, हळदही खेळला... 

राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या खाआणि ऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.  

Covid19 : राजेश टोपे यांनी सांगितला कोरोना प्रतिबंधाचा फॉर्म्युला; काय आहे '3T' फॉर्म्युला?

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्री महोदयांनी केला आहे.

COVID19 maharashtra state government has given permission to keep hotel kitechen open for home delivery 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID19 maharashtra state government has given permission to keep hotel kitchen open for home delivery