coronavirus: डोंबिवलीत आणखी एक कोरोना रुग्ण; लग्नात हजेरी, हळदही खेळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

राज्यात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना डोंबिवली शहरामध्येही आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.

डोंबिवली - राज्यात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना डोंबिवली शहरामध्येही आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत डोंबिवलीत कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या 2 झाली आहे. कोरोना बाधित युवकावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून या युवक काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान वरून डोंबिवलीत दाखल झाला होता. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 विशेष बाब म्हणजे या 27 वर्षीय युवकाच्या हातावर होम क्वांरटाइन चा शिक्का असूनही तो बिनधास्त पणे सर्वत्र फिरत होता. नुकतीच त्याने एका लग्नात व हळदी समारंभात हजेरी लावली होती. त्यामुळे  या दोन्ही समारंभात सहभागी झालेल्या लोकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान हा युवक खूप मोठया प्रमाणावर लोकांशी संपर्कात आल्याने  सर्वेक्षणासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. या वृत्ताला पालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.  आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती या युवकाने आपल्या मित्राला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. या संभाषनाचा स्क्रीन शॉट ही मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे. याअगदर पेरू देशातून आलेल्या एका 35 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.  मात्र सदर युवक सर्वत्र वावरला व इतरांचाही संपर्कात आल्याने  नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

आणखी वाचा - मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीय का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more corona patient in Dombivali