जरा ऐका आणि चुपचाप घरात राहा ! होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन प्रवास करणारे आणखी सहा पकडले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 मार्च 2020

मुंबई - एकांतात राहाण्याचा सल्ला दिलेल्या प्रवाशांना शहराबाहेर जाऊ देऊ नका असा सल्ला राज्य सरकारच्या समितीने दिला आहे. मात्र अद्याप सरकारकडून दिल्या गेलेल्या सूचनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हातावर होम कॉरंटाईनचा शिक्का असलेले सहा जण आज सौराष्ट्र मेलमध्ये आढळले आहेत. मुंबईतही बोरिवली स्टेशनवर TC कडून तिकीटाची तपासणी सुरु असताना हे साही प्रवासी पकडले गेलेत.   

मोठी बातमी - "भोंगा वाजलाय, वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

31 मार्च पर्यंत मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेने विमानतळावर अतिरीक्त वैद्यकिय पथक तैनात केले आहे.  यात  बाधित देशातून आलेल्या पण कोरोनाची बाधा नसल्याची कोणतीही लक्षण नसलेल्या प्रवाशांना हातावर "होम क्वारंटाईन' चा शिक्का मारुन घरी पाठवण्यात येणार आहे. मात्र, मुंबई विमानतळावर शहराबाहेरील प्रवासी उतरण्याची शक्यता आहे. बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना कोणत्याही परीस्थीतीत शहराबाहेर जाऊ न देणे गरजेचे आहे. अशी शिफारस राज्याच्या आरोग्य विभागाच्या तज्ञांच्या समितीने काल केली आहे. मात्र, मुंबईत या शिफारशीची अमंलबजावणी होताना दिसत नाही.

Inside Story कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी....

बुधवारी हातावर होमकॉरंटाईचा शिक्का असलेले काही प्रवासी ट्रेन मधून प्रवास करताना आढळले. त्यानंतर आजही हा प्रकार समोर आलाय. 

कोरोनाच्या विषाणूंची वाढ 14 दिवसात होते. म्हणूूून 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला जातो. अशात एखाद्या प्रवाशाला विषाणूची बाधा झाली असल्यास प्रवासादरम्यान थुंकी वाटे इतरांंना त्याची बाधा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे अनेक वेळा ऊशिरानेही दिसतात. त्यामुळे विमानतळावरील तपासणीत प्रवाशात प्राथमिक लक्षणे नसली तरी तो कोरोना बाधित नाही हे ठामपणे सांगता येणार नाही.  

covid19 six more people with home quarantine stamp busted on the railway station by TC

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid19 six more people with home quarantine stamp busted on the railway station by TC