esakal | "भोंगा वाजलाय, वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  
sakal

बोलून बातमी शोधा

"भोंगा वाजलाय, वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

"भोंगा वाजलाय, वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलंय. अशात महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडून विविध पावलं उचलली जातायत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने संवाद साधतायत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा घरात राहण्याचं आवाहन केलंय. घराबाहेर पडू नका, सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करा असं मुख्यमंत्री म्हणालेत. सर्व जग सध्या एका युद्धावर आहे. या युद्धात तुम्हा सर्वांचं सहकार्य हे आपलं बळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकारी सूचनांचं तंतोतंत पालन करा. ज्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांनी सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. आपल्याकडे सर्व यंत्रणा आहे, आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे काळजी करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. 

COVID2019 - 'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

विषाणूंची युद्ध  - वॉर अगेस्ट व्हायरस 

युद्धात जेंव्हा भोंगा वाजतो तेंव्हा युद्ध सुरु झालंय असं म्हणतात. अशात आपलं विधाणूंशी युद्ध सुरु झालंय. आपल्याकडे भोंगा वाजलाय, युद्ध सुरु झालंय. आपले डॉक्टर्स, सरकारी यंत्रणा, बस ड्रायव्हर, पोलिस यंत्रणा हे सर्व आपल्यासाठी लढतायत. जर आपल्याला वाचवण्यासाठी, सेफ ठेवण्यासाठी आपली यंत्रणा, आपली माणसं स्वतःची काळजी न करता घराबाहेर काम करतात तर आपण घरात राहू शकत नाही का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारलाय. 

सूचनांचं तंतोतंत पालन करा 

गेल्या काही दिवसात हातावर स्टॅम्प मारलेली लोकं इकडे तिकडे फिरताना पाहायला मिळालीत. अशात कळत नकळत आपण कोरोनाचा प्रसार करणं ही चूक आहे. त्यामुळे देशाबाहेरून जे भारतीय भारतात परतत आहेत त्यांनी सरकारतर्फे दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करायलाच हवं. इतरही कुणीही दिलेल्या सूचना पाळू नका, केवळ सरकारी सूचनांचं पालन करा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय. 

Inside Story - कोरोनाची दहशत आणि पॅरासिटामॉलची गोळी....

यंत्रणेवरील भार कमी करा :

आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यांची मला अपेक्षा आहे. आपण वर्क फ्रॉम होम करायला हवं. जास्तीत जास्त नागरिकांनी घरीच थांबा आणि गर्दी कमी करा. सरकार ट्रेन आणि बसेस बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं. पण सध्या तशी परिस्थिती नाही. मात्र सर्व नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करायला हवं. सरकारला तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे यंत्रणेवरील भार कमी होण्यास मदत होईल. दरम्यान यंत्रणेवरील भार कमी झाल्यास आपले डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, पोलिसांना आपण अधिक कार्यक्षम करू शकतो.

covid19 we are into war against virus says maharashtra cm uddhav thackeray 

loading image
go to top