क्रॉफर्ड मार्केट अपघातः अपघातावेळी नेमकं काय झालं?,चालकानं केला 'हा' दावा

अनिश पाटील
Friday, 4 September 2020

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर झालेल्या कार अपघातातील चालकाला अपघात घडतेवेळी अपस्माराचा झटका(फिट्स) आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे.

मुंबईः क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर झालेल्या कार अपघातातील चालकाला अपघात घडतेवेळी अपस्माराचा झटका(फिट्स) आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे 100 फूट दूर अपघात घडल्यानंतर आरोपीने कारसोबत महिलेला फरफटत आणले होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी(46) असे या कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे. समीर विरोधात 304(2), 279, 337, 427, 308 भादविसह मोटार वाहन कायदा कलम 183 व 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हारून मरेडिया(33) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरेडिया हे तेथील एका हॉटेलचे व्यवस्थापक असून त्याच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः  मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

क्रॉफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री 9 च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारनेदिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान अपघातात जमखी झालेल्या कमलेश सिंगचाही मृत्यू झाला. याप्रकरणातील चालकाच्या चौकशीत आरोपी चालकाला अपस्माराचा झटका यायचा. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यावर यासाठी उपचार सुरू आहेत. अपघात घडला त्यावेळीही त्याला अपस्माराचा झटका  आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. पोलिस त्याची सत्यता पडताळत आहेत.

(संपादनः पूजा विचारे)

crawford market epileptic seizure at the time of the accident driver said


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crawford market epileptic seizure at the time of the accident driver said