esakal | व्हायरसच्या मदतीनं तयार केल्या जाऊ शकतात बॅटरीज...

बोलून बातमी शोधा

व्हायरसच्या मदतीनं तयार केल्या जाऊ शकतात बॅटरीज...

जगात तब्बल १० लाख कोटींपेक्षा जास्त प्रकारचे व्हायरस आहेत. त्यापैकी कोरोनासारखे काही व्हायरस मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहेत, तर काही व्हायरसचा उपयोग चांगल्या कामांसाठीही केला जातो.

व्हायरसच्या मदतीनं तयार केल्या जाऊ शकतात बॅटरीज...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई:  आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलं आहे. जगात प्रत्येक व्यक्ती या व्हायरसपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी संघर्ष करत आहे. डोळ्यांनीही न दिसणाऱ्या व्हायरसनं संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. मात्र हे व्हायरस प्रचंड मोठा ऊर्जेचा स्रोत आहेत आणि यापासून बॅटरीज बनवल्या जाऊ शकतात असा दावा आता केला जातोय. 

जगात तब्बल १० लाख कोटींपेक्षा जास्त प्रकारचे व्हायरस आहेत. त्यापैकी कोरोनासारखे काही व्हायरस मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहेत, तर काही व्हायरसचा उपयोग चांगल्या कामांसाठीही केला जातो. MIT युनिव्हर्सिटीच्या बायोइंजिनीरिंगच्या प्राध्यापिका अँजेला बेलशर यांनी असे काही व्हायरस तयार केले आहेत. जे १५० निरनिराळ्या पदार्थांसोबत मिळून ऊर्जा निर्माण करू शकतात.

मोठी बातमी - 'या' जिल्ह्यांमध्ये लवकरच धावणार एसटी बस? पाहा तुमचा जिल्हा आहे का...

२००९ साली म्हणजेच आजपासून ११ वर्षांआधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमोर अँजेला बेलशर यांनी यासंबंधीचं प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यांचा हा अनोखा शोध नक्कीच सामान्य नव्हता. त्यामुळे बराक ओबामाही आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर अँजेला यांनी व्हायरसच्या मदतीनं बॅटरी तयार करून दाखवली होती.

अँजेला यांच्या म्हणण्यानुसार जर आपण उर्जेला भरपूर दिवस टिकवून ठेवण्यासाठी नॅनोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं व्हायरसपासून बॅटरी बनवू शकतो तर आपण लवकरच व्हायरसपासून बनवलेल्या बॅटरीवर चालणारी कारही बनवू शकतो.

कोणता आहे हा व्हायरस ?

अँजेला यांनी ज्या व्हायरसपासून बॅटरी बनवली आहे त्या व्हायरसचं नाव 'एम-१३ बॅक्टिरिओफेज' असं आहे. हा व्हायरस सिगारच्या आकाराचा दिसतो. हा व्हायरस स्वतःचं रूपांतर बॅक्टेरियामध्ये करतो. नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर करून हा व्हायरस वापरात आणला जाऊ शकतो.  

मोठी बातमी - मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या न घटल्यास, होणार 'हा' निर्णय?

यामुळे कशी होते ऊर्जा तयार ?

या व्हायरसला गरजेनुसार बदलता येऊ शकतं. जर आपण या व्हायरसच्या डीएनएमध्ये काही बदल केले तर हा व्हायरस एका खास तऱ्हेच्या वस्तुंना संपवू शकतो. म्हणजेच अधिक प्रमाणात व्हायरस तयार करू शकतो आणि याचं रूपांतर ऊर्जेत करू शकतो. जर याच प्रक्रियेला अधिक तीव्रतेनं केलं तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा तयार होते आणि ती आपण बॅटरीमध्ये साठवून ठेऊ शकतो. अँजेला यांनी तयार केलेल्या व्हायरसमुळे कोबाल्ट ऑक्साईडचे कण आकर्षित होतात ज्यामुळे बॅटरी तयार होते.

मोठी बातमी - 'कोपरी'त देखील राबवला जातोय 'भिलवाडा' पॅटर्न 

अँजेला यांनी बनवली हवेवर चालणारी बॅटरी:

अँजेला यांनी हवेवर चालणारी बॅटरीही तयार केली आहे. ज्यामध्ये बॅटरीला हवा लागल्यामुळे त्यातले व्हायरस ऍक्टिव्ह होतात आणि बॅटरीच्या आतल्या कणांना खाऊन ऊर्जा तयार करतात. ज्यामुळे हवेच्या  मदतीनं बॅटरीवर चालणाऱ्या गोष्टी वापरात आणल्या जाऊ शकतात.

"अनेक लोकांनी माझ्या या संकल्पनेवर आधी विश्वास ठेवला नाही मात्र आता काही कंपन्या माझ्या या व्हायरसपासून बॅटरी तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी पैसे द्यायला तयार आहेत"  असं प्राध्यापिका अँजेलो बेलशर यांनी म्हंटलंय.

creation of batteries through virus unique experiment done 11 years ago