'या' जिल्ह्यांमध्ये लवकरच धावणार एसटी बस? पाहा तुमचा जिल्हा आहे का...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या आधारावर राज्य सरकारने तीन "झोन' तयार केले आहेत. त्यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन असा क्रम आहे. त्यानुसार 15 पेक्षा कमी कोरोना रुग्ण असलेला ऑरेंज आणि रुग्ण नसलेल्या ग्रीन झोनमध्ये 30 एप्रिलनंतर जीवनावश्‍यक सेवांसह शहरांतर्गत एसटी वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या आधारावर राज्य सरकारने तीन "झोन' तयार केले आहेत. त्यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन असा क्रम आहे. त्यानुसार 15 पेक्षा कमी कोरोना रुग्ण असलेला ऑरेंज आणि रुग्ण नसलेल्या ग्रीन झोनमध्ये 30 एप्रिलनंतर जीवनावश्‍यक सेवांसह शहरांतर्गत एसटी वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या न घटल्यास, होणार 'हा' निर्णय!

गर्दी टाळण्यासाठी राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा जाणवायला लागला असून, काही ठिकाणी जादा किमतीत जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उपाशी राहायची वेळ आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांच्या आधारावर विभाग निश्‍चित केले आहेत. यामध्ये 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्याला "रेड' रंग दिला असून हे जिल्हे वगळता "ऑरेंज' आणि "ग्रीन झोन'मधील जिल्ह्यांत एसटीची शहरांतर्गत सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्या गाड्यांना जिल्ह्यांच्या बाहेर जाण्यास बंदी राहणार आहे. 

ही बातमी वाचली का? गोरगरिबांसाठी नगरसेविका बनल्या भाजी विक्रेत्या!

रेड झोन जिल्हे 
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबाद 

ऑरेंज झोन जिल्हे 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया 

ग्रीन झोन' जिल्हे 
धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.

सध्या नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्‍यक सेवेतील एसटी सुविधा सुरू आहे. मात्र, अद्याप झोननुसार सेवा सुरू करण्याचे निर्देश नाहीत. एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक विभाग.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will ST bus run in Orange, Green Zone district?