Crime News : सैफी हॉस्पिटल बनावट इंजेक्शन प्रकरणी 3 आरोपी अटकेत

आरोपी औषध कंपन्याचे मालक
Crime 3 accused arrested in Saifi Hospital fake injection case accused Owners drug companies
Crime 3 accused arrested in Saifi Hospital fake injection case accused Owners drug companiesesakal

मुंबई : सैफी हॉस्पिटलमध्ये बनावट इंजेक्शन मृत्यू प्रकरणी व्ही पी रोड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ऑक्‍टोबर 2022 मध्‍ये बनावट इंजेक्शन दिल्‍याने विवेक कांबळी नामे सरकारी अधिका-याचा मृत्यू झाला होता.

या मृत्‍यूप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांनी दोन फार्मास्युटिकल फर्मच्‍या तीन मालकांना अटक केली आहे. या आरोपीत जय माँ अंबे मेडिकोजचे अमित बन्सल (47), देश दीपक सुरी (52) आणि कान्हा फार्माचे प्रदीप अग्रवाल (36) यांना गुरुवारी दिल्लीत अटक करण्यात आली.

न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केला असून त्यातील बन्सल आणि सुरी यांना 13 फेब्रुवारी रोजी गिरगाव न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. आरोपी प्रदीप अग्रवाल शनिवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर झाले आणि त्यांना व्हीपी रोड पोलिस कोठडीत पाठवण्यात आले.

प्रकरण काय?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे 55 वर्षीय अधिकारी विवेक कांबळी यांच्या मृत्यूप्रकरणी 7 जानेवारी 2023 रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यामध्ये 12 व्यक्तीचा समावेश होता. त्या 12 आरोपींमध्ये हे तिघे आरोपीवर सुद्धा गुन्ह्याची नोंद आहेत. 11 ऑक्टोबर रोजी सैफी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचारादम्यान इंजेक्शन दिल्यानंतर कांबळीची प्रकृती खालावली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

पत्नीच्या तक्रारीमुळे सत्य उघड

विवेक कांबळीची पत्नी सुषमा कांबळी या देखील एक सरकारी कर्मचारी आहे. यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर, सैफी हॉस्पिटलने अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती दिली, ज्यांनी सखोल चौकशी केली आणि निर्मात्यापासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत इंजेक्शनच्या पुरवठा साखळीचा मागोवा घेतला.

अन्न आणि औषध प्रशासनाने पालघरमधील तारापूर येथील समृद्ध फार्मास्युटिकलकडे तपासणीसाठी इंजेक्शनचे नमुने पाठवले होते, ज्यामध्ये इंजेक्शन बनावट असल्याचा निष्कर्ष आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने पोलिस तक्रार दाखल करत, भारतीय दंड संहितेच्या कलम 304(2), 465, 468, 471, 473 आणि अन्न आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या संबंधित कलमांखाली व्ही पी मार्ग पोलीसात गुन्ह्याची नोंदवण्यात आली. .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com