चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबईतील 30वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा, CBI ची कारवाई  

अनिश पाटील
Monday, 26 October 2020

आरोपी स्वतःला फिल्म कलाकार असल्याचे सांगून अल्पवयीन मुलांना फिल्म स्टार बनवण्याचे आमिष दाखवायचा.

मुंबई : अल्पवयीन मुलांना फिल्मस्टार बनवण्याचे आमिष दाखवून यांच्याकडून आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ मिळवून त्यांना पोर्नोग्राफीमध्ये ढकलणाऱ्या मुंबईतील 30 वर्षीय व्यक्तीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला.  याप्रकरणी सीबीआयने घरामध्ये शोध मोहीम राबवली. 

प्राथमिक आपसात आरोपीने अमेरिका, युरोप आणि दक्षिण आशियातील हजाराहून अधिक मुलांशी इन्टाग्रामद्वारे  संपर्क साधला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मुलं 10 ते 16 वयोगटातील आहेत.  घरात राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.  दरम्यान सायबर न्यायवैद्यक तज्ज्ञांशी याप्रकरणी मदत घेण्यात येत आहे. आरोपीने WhatsApp आणि इतर माध्यमांच्या सहाय्याने  परदेशी ग्राहकांना अश्लील फोटो व व्हिडीओ विकला असल्याचा संशय आहे.

महत्त्वाची बातमी : दानवे यांचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप माझ्यासोबत, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी कंगनालाही सुनावलं

आरोपी स्वतःला फिल्म कलाकार असल्याचे सांगून अल्पवयीन मुलांना फिल्म स्टार बनवण्याचे आमिष दाखवायचा. त्यानंतर त्यांच्याकडून असलेले फोटो व्हिडिओ बनवायचा त्यानंतर त्याच्या साह्याने ब्लॅकमेल करायचा.  व्हिडीओ कॉलिंगच्या सहाय्याने लाइव्ह पोर्नोग्राफिक करण्यासाठी दबाव टाकायचा असा संशय आहे.  व्हिडिओ पुढे परदेशी ग्राहकांना वितरित करण्यात यायचे. तसेच एखाद्याने त्याचे ऐकण्यास नकार दिला दिल्यास आरोपी त्याचे अश्लील फोटो कुटुंबीय आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी द्यायचा.

आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

crime against children CBI registered case against 30 years old man


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime against children CBI registered case against 30 years old man