दानवे यांचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप माझ्यासोबत, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी कंगनालाही सुनावलं

दानवे यांचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप माझ्यासोबत, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी कंगनालाही सुनावलं

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून दसरा मेळाव्यानिमित्त शिवसैनीकांना संबोधित केलं. आपल्या दसरा मेळावा भाषणात उद्धव ठाकरे यांनी मागील एक वर्षात त्यांच्या मनात जे साचून आहे ते बोलून दाखवलं. 

माझा बाप माझ्यासोबत माझ्या विचारांमध्ये : 

दरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे संतापले. उद्धव ठाकरे म्हणालेत की, दानवे यांचा बाप दिल्लीत असेल. माझा बाप माझ्यासोबत माझ्या विचारांमध्ये आहे. मला भाडोत्री बाप नको तो तुमच्याकडेच ठेवा. आम्ही केलं लग्न, आहेराची पाकीट पळवणारे बाप तुमचे आहेत ते तुम्हाला लखलाभ असो. अशा कठोर शब्दात ठाकरे यांनी दानवेंचा समाचार घेतला.  

महाराष्ट्रावर दहा तोंडी रावण हल्ला करतोय. बाॅलिवुडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणावर तिखट शब्दात बोलताना ठाकरे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची. मराठी माणसाला भीक मागून नाही तर हक्काने खायला शिवसेनेने शिकवले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे म्हणून राज्याची बदनामी केली जात आहे. मुंबई पोलिस निक्कमे आहेत असे बोलले जात आहे. पोलिसांचा देखील मी कुटुंब प्रमुख आहेत त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही अशा इशारा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून दिला. मुंबई पोलिसांनी छातीवरती गोळी घेऊन अतिरेक्याला जिवंत पकडणारे जगात एकमेव मुंबई पोलिस दल आहे, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये गांजाचे नाही तर तुळशी वृंदावन आहेत ही आमची संस्कृती आहे असेही ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात पाकव्याप्त काश्मीर असेल तर ते महाराष्ट्राचे नव्हे तर पंतप्रधानांचे अपयश आहे. अशा शब्दात ठाकरे यांनी कंगना रानावत चे नाव न घेता टोला लगावला. 

आरे कारशेड बाबतही ठाकरे यांनी भाजपला सुनावले. जंगलाच संवर्धन करण्याचे काम हे या सरकारने केलं आहे. कारशेड हे हलवण्यात आले आहे त्यामध्ये सरकारचा एक रुपया देखील गेलेला नाही. अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. इथे मर्द मावळ्यांच सरकार आहे. अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला.

( संपादन - सुमित बागुल )

uddhav thackerays dussehra melawa speech targets raosaheb danave and kangana ranaut

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com