मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - विखे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी संबंधित बिल्डरसह दोषी महापालिका अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि महापालिका आयुक्तांना तातडीने निलंबित करावे. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील सर्व बहुमजली इमारतींना मिळालेले परवाने व इतर संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांकडून स्वतंत्र अंकेक्षण करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे, की क्रिस्टल टॉवर या बहुमजली इमारतीला आग लागून 4 जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. उपलब्ध माहितीनुसार, या इमारतीसाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होण्यापूर्वीच त्या ठिकाणी अनेक कुटुंबांचे वास्तव्य सुरू झाल्याचे तसेच इमारतीमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. ही वस्तुस्थिती असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime against homicide case says vikhe