esakal | भाईंदरमध्ये गरब्याचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भाईंदरमध्ये गरब्याचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : नवरात्रौत्सवाला (Navratri) अद्याप सुरुवात झालेली नसतानाच भाईंदर (Bhayandar) पश्चिम येथे एका गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोविड नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणार गर्दी झाली होती.

गरबा खेळणाऱ्या अनेकांनी मास्क परिधान केले नव्हते तसेच सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाला होता. भाईंदर पोलिसांना यांची माहिती मिळताच त्यांनी घडक कारवाई करुन गरबा नाईटच्या आयोजकांवर तसेच हॉल मालकावर गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पश्चिम येथील उड्डाणपूला नजीक जे सी एस बँक्वेट हॉल याठिकाणी शनिवारी रात्री गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा: माझ्यापेक्षा नवरा चांगला कूक अभिनेत्री नूपुर सांगतेय...

कार्यक्रमासाठी २५० प्रती व्यक्ती प्रवेश शुल्क देखील ठेवण्यात आले होते. पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश असतानाही कार्यक्रमाला सुमारे दिडशे ते दोनशे तरुण आणि तरुणी उपस्थित होते. संगीताच्या तालावर नाचणाऱ्या युवकांनी चक्क मास्कही परिधानही केले नव्हते

loading image
go to top