मुंबई : 'त्या' रॅकेटचा पर्दाफाश; उत्तरप्रदेशच्या सहा जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprits arrested
मुंबई : 'त्या' रॅकेटचा पर्दाफाश; उत्तरप्रदेशच्या सहा जणांना अटक

मुंबई : 'त्या' रॅकेटचा पर्दाफाश; उत्तरप्रदेशच्या सहा जणांना अटक

मुंबई : मुंबईतील एका व्यवसायीकाची पैशांच्या गैरव्यवहारात (Money fraud crime) फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) एका तथाकथीत अध्यात्मिक गुरुसह सहा जणांना अटक (Spiritual leader arrested) केलीय. अनिलकुमार इश्वरशरण सिंग (६३), भास्करराव योसुपोगु (४४), अरिंद्रम डे (३८), विनय नायर उर्फ नरेंद्र मेहरा (५०), सुमित नगदराळे उर्फ सुमित पंजाबी (३१) आणि अजय कुमार निषाद (४३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (crime branch police arrested six culprits from uttar pradesh in money fraud crime)

हेही वाचा: मन झालं बाजिंद: राया-कृष्णावर होणार जीवघेणा हल्ला

"आरोपी भास्करराव तक्रारदार व्यवसायीकाला भांडुपमध्ये एका हॉटेलमध्ये भेटला. कॅनडातील एका कंपनीला तब्बल १५ बिलियन युरोजला किमती धातू विकल्याचं आरोपीनं तक्रारदार व्यवसायीकाला सांगितलं होतं. कॅनडा कंपनीकडून तब्बल ५५ हजार कोटीं रुपये मला मिळणार आहेत मात्र कराचा भरणा न केल्याने आरबीआयकडून पैसे थांबविण्यात आले. मला कर भरण्यासाठी २७ कोटी रुपयांची गरज आहे. असंही भास्करावने व्यवासायिकाला सांगितलं." अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरोपी भास्कररावने व्यवासीकाकडे त्याच्या वैयक्तीक पैशांच्या व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी २७ कोटी रुपयांची मागणी केली. २७ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर भास्कररावला मिळणाऱ्या परकिय चलनाच्या एकूण रक्कमेच्या ४० टक्के रक्कम व्यवसायीकाला दिले जातील. त्यानंतर ६० लाख रुपये टोकन रक्कमेच्या स्वरुपात व्यवहार ठरला. मात्र, व्यवसायीकाने फक्त ३० हजार रुपये भास्कररावला दिले. दुसऱ्या दिवशी भास्करराव कॅनडातील पैशांचा व्यवहार करण्यासाठीचे कागदपत्रे घेवून आला मात्र व्यवसायीकाने पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत यापूर्वीच कळवलं होतं. त्यामुळे आरोपींना गुन्हे शाखेनं वेळीच अटक केल्याने व्यवसायीक त्यांच्या जाळ्यात अडकला नाही.

हेही वाचा: जोधपूर : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार; शिक्षकाला अटक

आरोपीनं त्याच्या पैशांचा व्यवहार सुरळीत होण्यासाठी व्यवसायीकाकडे ६० लाख रुपयांची मागणी केली. टोकन रक्कम दिल्यावर कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर केवायसीची कागदपत्र आरबीआयमध्ये द्यावी लागतील. अशा प्रकारचा व्यवहार आरोपीने व्यवसायीकाकडे केला होता. मात्र, आरोपीनं आणलेली सर्व कागदपत्रं बोगस असल्याने या रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला." अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत पाल यांनी दिली आहे.

या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी आरबीआय, डीआरडीओ आणि अन्य सरकारी यंत्रणांची बोगस कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या रॅकेटचा मास्टर माईंट हैद्राबादमध्ये असल्याची शक्यता आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांनी दिली आहे. आरोपी आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असल्याचा दावा केला जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top