
गांजा पिण्यावरून वाद, तरुणाने मित्रालाच ढकललं टेरेसवरून खाली
गांजा पिण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्रालाच इमारतीच्या टेरेसवरून ढकलल्याची धक्कादायक घटना कुर्ला (Kurla) परिसरात उघडकीस आली आहे. आज सकाळी ही घटना समजताच या परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेत अमान उर्फ बिटू आफताब शेख या १९ वर्षीय तरुणाचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे. (Mumabi News)
घडलेली घटना अशी की, (Crime Case) गांजा पिण्याच्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्रालाच इमारतीच्या टेरेसवरून खाली ढकललं आहे. कुर्लाच्या दावल चाळ येथील रोशन मस्जिद जवळ ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी (Police Action) घेतली असुन पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सदर घटनेशी संबंधित मोहम्मद सुलतान अकबर अली खान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्याने हे कृत्य का केले यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे. या अचानक घडलेल्या घटनेने मात्र या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.