Crime News I मुलींना अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेलिंग करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news in mumbai

नरधम दांडू याने याआधीही 550 पेक्षा अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवले आहेत.

मुलींना अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेलिंग करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : एका नराधमाने महाविद्यालयीन तरुणींला तिच्या फोनवर अश्लील व्हिडिओ पाठवले. याशिवाय या तरुणाने इतरही अनेक मुलींना असे अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार फेब्रुवारीमध्ये पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान, पाच महिन्यानंतर त्या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांनी यश आले आहे. याप्रकरणातील आरोपी रवी दांडू (वय ३०) याला पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, नरधम दांडू याने याआधीही 550 पेक्षा अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवले आहेत. यासाठी तरुणाने 10 मोबाईल आणि 12 वेगवेगळ्या सिमचा वापर करत महिलांना ब्लॅकमेल केले आहे. याप्रकरणी अंधेरीच्या एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी, आरोपीने व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवण्यासाठी अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींची संपर्क यादी चोरली होती.

आरोपी हा एका खासगी बँकेच्या तांत्रिक विभागात कंत्राटी कर्मचारी आहे. त्याने विलेपार्ले महाविद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थिनींला आणि तिच्या संपर्कातील सुमारे ३५ विद्यार्थिनींना ब्लॅकमेल केले होते. त्याने पीडितांचे मार्फ केलेले व्हिडिओ पाठवत माझ्यासोबत वेळ घालवा अशी मागणीही केली होती. दरम्यान, एका ब्लॅकमेल केलेल्या मुलीला बुधवारी भेटायला बोलावल्यानंतर दांडूचा त्याच्या सायनच्या घरी शोध घेण्यात आला.

आरोपी एका बॅंकेत कामाला असल्याने बँकेच्या डेटाबेसमधून त्याने विद्यार्थीनींचे संपर्क नंबर मिळवले होते. विद्यार्थीनीने तक्रारीत म्हटलंय की, व्हॉट्सअॅपवर या आरोपीने स्वत:ची ओळख महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून करुन दिली होती.

नोट्स आणि अभ्यासाचे साहित्य पाठवण्यासाठी त्याने विद्यार्थींनींचा एक गट तयार केला आहे, अशी बतावणी केली होती. मात्र आरोपीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून OTP शेअर केला असता त्याने अश्लील क्लिप पाठवण्यास सुरवात केली. त्यानंतर विद्यार्थीनीने व्हॉट्सअॅप बंद करत 20 फेब्रुवारी रोजी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आरोपी तंत्रज्ञानात कुशाग्र असल्याने त्याच्या विरोधात पुरावे सापडत नव्हते. मात्र पोलिसांना अखेर पाच महिन्यांनंतर त्याला पकडण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी त्याचे 10 फोन जप्त केले असून POCSO कायद्यांतर्गत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.