Mumbai News : कल्याण न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना 20 वर्षाचा कारावास

8 वर्षांपूर्वी कल्याण मधील आडीवली ढोकळी परिसरात हा गुन्हा घडला
crime judgement of kalyan court over minor girl abuse 20 years imprisonment to two accused mumbai police
crime judgement of kalyan court over minor girl abuse 20 years imprisonment to two accused mumbai policesakal

डोंबिवली - नैसर्गिक विधीवरून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अजमत छोटनअली शेख (वय 28) आणि खुर्शीद महंमदइदी आलम शेख (वय 30) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

8 वर्षांपूर्वी कल्याण मधील आडीवली ढोकळी परिसरात हा गुन्हा घडला होता. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. हर्णे यांनी हा निकाल दिला आहे. कल्याण पूर्वेतील आडीवली - ढोकळी परिसरात 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती.

घराच्या तळमजल्यावर असलेल्या खोलीतल्या बाथरुमध्ये नैसर्गीकविधीनंतर बाहेर येऊन ती खोलीचा दरवाजा बंद करून कुलुप लावत होती. इतक्यात घराचे समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीमध्ये राहणारे आणि पीओपीचे काम करणारे अजमत आणि खुर्शीद या दोघांनी या मुलीचे तोंड दाबत तिला समोरील इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीमध्ये नेऊन डांबले.

crime judgement of kalyan court over minor girl abuse 20 years imprisonment to two accused mumbai police
Mumbai Crime : कर्ज फेडण्यासाठी  त्याने निवडला चोरीचा मार्ग...हाती पडल्या बेड्या

त्याठिकाणी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर इथून गप्प घरी, जे काही झाले त्याबद्दल कोणाला काही सांगू नको, नाही तर तुला सोडणार नाही अशी धमकी या नराधमांनी मुलीला दिली. मुलीला त्रास असाह्य झाल्याने या मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.

घटनेची माहिती समजताच मुलीच्या पालकांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक निलेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासचक्रांना वेग देऊन दोघा आरोपींना अटक केली.

crime judgement of kalyan court over minor girl abuse 20 years imprisonment to two accused mumbai police
Akashvani Pune Centre: प्रसार भारतीचा मोठा निर्णय! आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार

या प्रकरणाचे तपास अधिकारी निलेश पाटील यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सहाय्यक सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे-पाटील व जयश्री बठेजा यांनी कामकाज पाहिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सुरेश मदने, अतुल लंबे या अधिकाऱ्यांचे या खटल्यात सहकार्य लाभले.

अजमत शेख व खुर्शीद शेख हे दोघेही सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या संपूर्ण खटल्याचा निकाल देताना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. हर्णे यांनी दोघांना दोषी ठरवून भादंवि कलम 376 (ड) करिता 20 वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी 20 हजार रूपये दंड, हा दंड न भरल्यास 1 महिना सश्रम कारावास.

crime judgement of kalyan court over minor girl abuse 20 years imprisonment to two accused mumbai police
Mumbai News : रील बनवण्याच्या नादात खोल विहिरीत पडला; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

भादंवि कलम 366 (अ) करिता 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 5 हजार रूपये दंड, हा दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास. भादंवि कलम 367 करिता 7 वर्षे सश्रम कारावास शिक्षा व प्रत्येकी 5 हजार रूपये दंड, हा दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास. भादंवि. कलम 343 करिता 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 500 रूपये दंड, हा दंड न भरल्यास 15 दिवस साध्या कारावासाची शिक्षा. ही संपूर्ण शिक्षा आरोपींनी एकत्रितपणे भोगावयाची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com