Crime News : धक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्याची महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी; गुन्हा दाखल

Nandu Joshi
Nandu Joshi

डोंबिवली - भारतीय जनता पार्टीचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. जोशी यांनी खोली खाली करण्यासाठी धमकी तसेच शारीरीक सुखाची मागणी केल्याची तक्रार महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात केली आहे.

Nandu Joshi
Dr. Lahane Resigns: डॉ. लहाने, पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांचे राजीनामे; नेमकं काय घडलंय वाचा?

दाखल तक्रारीनुसार मानपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. महिलेने केलेले हे आरोप जोशी यांनी फेटाळले असून सदर महिला ही माझ्या मित्राची बायको आहे. तिच्यासोबत मी कोणतेही संभाषण अद्यापपर्यंत केले नाही. पोलिसांनी याचा सखोल तपास करावा अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांनी शारीरिक सुखाची मागणी तसेच घर खाली करण्यावरून धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी कलम 354 (अ), 506 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Nandu Joshi
Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनात प्रीतम मुंडेंचा केंद्र सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या...

या विषयी मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, ती महिला ही माझ्या मित्राची बायको आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहेत. मी मित्राला मदत करतो असे तिला वाटत असल्याने, याचा तिला राग असल्याने तिने माझ्याविषयी तक्रार केली आहे. मी आतापर्यंत कधीही त्या महिलेला कधी फोन केला नाही. संदेश पाठवलेला नाही. समोर देखील काही बोललेलो नाही. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी असे म्हणणे त्यांनी मांडले आहे.

भाजपचे आंदोलन

मानपाडा पोलीस स्टेशनच्या वर्तणुकीबाबत राजकीय पक्ष तक्रारी करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नंदू जोशी यांचेवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांचं नाव कसं खराब आणि बदनाम होईल असे कारस्थान मानपाडा पोलीस रचत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मानपाडा पोलीस स्टेशनच्या विरोधात गुरुवारी सकाळी 11 वाजता मानपाडा पोलीस स्टेशन समोर निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com