
Mumbai News : अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या मुलीची 3 महिन्यानंतर सुटका
मुंबई : दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या जवळपास तीन महिन्यांनंतर मुंबई पोलिसांनी चिमुकलीची सुटका करून अपहरणकर्त्याला अटक केली . मुंबई पोलिसांनी या मुलीला पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथून सोडवले असून असिफ अली शेख या आरोपी अपहरकर्त्याला अटक केली आहे.
गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवरून आरोपी आसिफ अली शेख ने मुलीचे अपहरण केले . याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्या पालकांकडून घेतले.
आरोपी सुद्धा स्कायवॉकवर एकमेकांच्या शेजारी राहत होते आणि मुलीचे आई-वडील शेखच्या परिचयाचे होते. त्यामुळे मुलीच्या पालकांना संशय आला नाही . पण बराच वेळ झाला तरी दोघं परत आलेच नाहीत.
यानंतर मुलीच्या आईने वांद्रे पोलिस स्टेशन गाठले, तेथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून पोलीस अधिकारी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांकडे अपहरणकर्त्यासोबत असलेल्या मुलीचे सीसीटीव्ही फुटेजही होते पण त्यांचा शोध घेता आला नाही.
वांद्रे पोलिसांच्या पथकाने दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरिद्वार, पाटणा, मालदा आणि हावडा येथे मुलीचा शोध घेतला. त्यानंतर गुप्त माहितिदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार असीम शेख सिलीगुडी येथील त्याच्या घरी होता .
पोलिसांनी कारवाई करत सिलीगुडी येथील आरोपीच्या घरात छापा टाकत आरोपीला जेरबंद केला आणि मुलीचीही सुटका करण्यात आली. त्यानंतर तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.