
Crime News : मुंबईत कुर्ला परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना
मुंबई : मुंबईत एका 42 वर्षीय महिलेवर तिच्या घरात तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. तीन आरोपींनी महिलेवर बलात्कार करून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले तसेच सिगारेटच्या सहाय्याने तिच्या गुप्तांगावर जखमा केल्याचा महिलेचा आरोप आहे.ही घटना बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी पहाटे कुर्ला येथे घडल्याची माहिती आहे . विशेष म्हणजे आरोपी आणि पीडिते एकाच परिसरात राहतात. पोलिसांनी या प्रकरणी रविवारी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
बुधवारी पहाटे कुर्ल्याच्या इंदिरा नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर 3 आरोपीनी एकामागून एक सामूहिक बलात्कार करून अनैसर्गिक संबंध बनवले. आरोपीनी सिगारेटच्या सहाय्याने महिलेच्या गुप्तांगाना सिगरेटचे चटके दिले. तिच्या छातीवर आणि दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार केले. त्यातीलएका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तिने पोलिसांकडे गेल्यास ते प्रसारित करण्याची धमकी दिली.
महिलेने या सर्व घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली, त्यांनी एका एनजीओशी संपर्क साधला आणि कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवला.या तिघांवर भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार), 376डी (सामूहिक बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्राने दुखापत करणे) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.