Crime News : वाढदिवशी दुर्दैवी मृत्यू...! मित्राच्या वाढदिवशीच डिजेचा वाद अन् वादातून हत्या

Crime News
Crime Newsesakal

मुंबई : वाढदिवस साजरा केल्यानंतर डिजेचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात चौघांनी मित्राला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून जब्बार मिर्जा याच्यासह एका 17 वर्षांच्या मुलाला अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Crime News
Crime : फसविण्याची नवी शक्कल! दिल्ली पोलिसांच्या वेशात येऊन घातला कोट्यवधीला गंडा...

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणारा साबीर अन्सारी याचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यामुळे त्याने मित्रांना गोवंडी परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टी दिली. त्यानंतर मित्रांनी साबीरचा वाढदिवस अधिक जोरात साजरा करण्यासाठी परिसरात डीजेचे आयोजन केले.

Crime News
Dr. Tatyarav Lahane : राजीनामा देण्याआधीची डॉ. लहानेंची कारकीर्द कशी आहे ?

रात्री कार्यक्रम संपल्यानंतर साबीरने मित्रांना डीजेचे पैसे देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी साबीरला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. शिवाजी नगर पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून जब्बार मिर्जा याच्यासह एका 17 वर्षांच्या मुलाला अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com