मास्क नाही, मग कारवाई होणारच! मास्कविना फिरणाऱ्या तब्बल 'इतक्या' जणांवर गुन्हे दाखल

mask
mask

ठाणे : प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून विनामास्क फिरणाऱ्या 630 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे 19 मार्च ते 2 जुलै या लॉकडाऊन कालावधीत ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळात एकूण 2, 666 गुन्हे दाखल केले असून अद्यापही कारवाई सुरूच असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी 8 एप्रिलला घराबाहेर, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य करण्याबाबतचे आदेश काढून यात कुचराई करणाऱ्यांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे बजावले होते. त्यानुसार, 9 एप्रिल ते 2 जुलै या कालावधीत ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण परिमंडळात विनामास्क फिरणाऱ्यावर सर्वाधिक 293 गुन्हे दाखल असून, ठाणे परिमंडळात 49, भिवंडीत 91, उल्हासनगरमध्ये 82 आणि वागळे परिमंडळ 5 मध्ये 115 असे एकूण 630 गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, 19 मार्च ते 2 जुलै या कालावधीत मनाई आदेशाचा भंग केल्याचे 2 हजार 630 गुन्हे दाखल असून पोलिसांवर हल्ले केल्याचे 16 गुन्हे आणि अफवा पसविल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

(संपादन : वैभव गाटे)

crimes have been registered against so many people without masks

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com