esakal | नक्की वाचा : कोरोनाची औषधं आणि औषधांच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची आणि मोठी बातमी...
sakal

बोलून बातमी शोधा

tablet

राज्याभोवती कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या तब्बल ९० हजारांच्या पार पोहोचली आहे.

नक्की वाचा : कोरोनाची औषधं आणि औषधांच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची आणि मोठी बातमी...

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

मुंबई: राज्याभोवती कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या तब्बल ९० हजारांच्या पार पोहोचली आहे. अजूनही कोरोना विषाणूंवर लस उपलब्ध नाहीये त्यामुळे  रुग्णांना सध्या काही औषधं दिली जात आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या औषधांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. आता राज्य सरकारकडून याबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: ब्रेकिंग - विकास दुबे प्रकरणात ठाण्यात मोठी कारवाई, दुबेच्या दोन साथीदारांच्या ATS ने आवळल्या मुसक्या  

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाच्या औषधांचा तुटवडा आता भासणार नाही कोरोनाच्या औषधांचा सोमवारपासून सुरळीत पुरवठा करण्यात येईल अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. उत्पादक कंपन्या आणि काही वितरक यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.   

ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत त्यांना या औषधांची गरज नाही मात्र गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी सोमवारपासून या औषधांचा पुरवठा सुरळीत होईल असंही राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं आहे. 

काही भारतीय कंपन्या आणि जगातल्या इतर कंपन्या कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस तयार करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता ही लस लाँच होण्यासाठी २०२१ उजाडेल असं आयसीएमआरकडून सांगण्यात आलंय. 

हेही वाचा: कोरोनामुळे दंतवैद्यकांपुढे संकटांचा डोंगर; कठोर उपाययोजनांसह खर्चही वाढला....

त्यामुळे आता सध्या रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही ही काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. सोमवारपासून औषधांचा सुरळीत पुरवठा होणार असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलंय.      

corona tablets will avaialble constantly from monday 

loading image