Mumbai News : आरोपी अनिश्का जयसिंघानीची गुन्हेगारी कनेक्शन; तपासात माहिती उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal connections of accused Anishka Jaysinghani investigation revealed mumbai

Mumbai News : आरोपी अनिश्का जयसिंघानीची गुन्हेगारी कनेक्शन; तपासात माहिती उघड

मुंबई : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी देण्याच्या आरोपात मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. अनिक्षा जयसिंघानीला 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.

अनिक्षा ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाबरोबर तिचे वडिल अनिल जयसिंहानी यांच्याविरोधाताही तक्रार दाखल केली आहे. अनिल जयसिंहानी हा 5 राज्यात वॉन्टेड आहे, इतकंच नाही तर 8 वर्षांपासून तो फरार असल्याची माहिती आहे.

कोण आहे अनिल जयसिंहानी?

अनिल जयसिंघानी हा मोटा सट्टेबाज असून तो उल्हासनगरचा रहिवासी आहे . 5 राज्यात 17 गुन्हे त्याच्या नावावर दाखल असून गेल्या 8 वर्षांपासून तो फरार आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे.

इतकंच नाही तर गोवा पोलिसांनी 11 मे 2019 रोजी अनिल जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आठ वर्षांपूर्वी 2015 मे मध्ये गुजरात पोलीसानी जयसिंहानी याच्या दोन घरांवर छापा मारला होता. त्याच्याविरोधात मनी लॉण्ड्रींग प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला.

पण तब्येतीचं कारण देत तो फरार झाला. त्यानंतर मुंबईतल्या दोन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवूणीकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल जयसिंघानी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्याही रडारवर आहे.

अनिल जयसिंहानी उल्हासनगरमध्ये क्रिकेट बुकी म्हणून काम करत होता. अहमदाबाद सेशन कोर्टानेही त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे. गुजरात इडीव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, आसाम, मध्यप्रदेशमध्येही त्याचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Mumbai News