बेपत्ता रुग्ण मृत्यू प्रकरणाची राज्यपालांकडून गंभीर दखल; कडक कारवाईचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोव्हिड रुग्णालयामधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याचे आश्‍वासन राज्यपाल कोश्‍यारी यांनी आज दिले. 

ठाणे : महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोव्हिड रुग्णालयामधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याचे आश्‍वासन राज्यपाल कोश्‍यारी यांनी आज दिले. 

ही बातमी वाचली का? ठाणे मृतदेह अदलाबदली प्रकरणी मोठी कारवाई, आयुक्तांची दिलगिरी

ग्लोबल हब येथील रुग्णालयात दाखल केलेले वृद्ध भालचंद्र गायकवाड बेपत्ता झाल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने नातेवाईकांना सांगितले होते. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवल्यानंतर ठाणे भाजपनेही महापालिका आयुक्त व पोलिसांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला होता. यासंदर्भात राज्यपाल कोश्‍यारी यांची भाजपचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज राजभवन येथे भेट घेतली. या वेळी गायकवाड व सोनावणे कुटुंबीयांनीही आपल्या भावना राज्यपालांकडे व्यक्त केल्या. 

ही बातमी वाचली का? विकास दुबेच्या एन्काउंटरवर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा म्हणतात, हा एन्काउंटर तर...

औषधांचा काळाबाजार 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिव्हिर व टॉसिलिजुमैब औषधांचा मुंबई महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून काळाबाजार चालू असल्याप्रकरणी कारवाईची मागणी राज्यपाल कोश्‍यारी यांच्याकडे करण्यात आली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान "राजगृह'वर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदनही आमदार निरंजन डावखरे यांनी राज्यपालांना दिले. 

----------------------

(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Critical case of thane missing patient death Governor bhagat singh koshyari; Instructions for strict action