Crop Loan Waiver : पीककर्जमाफीवर शिक्कामोर्तब होणार?, मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मोहर शक्य

Crop Loan Relief : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. पीककर्जमाफीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून सरकार मोठी घोषणा करू शकते.
Crop Loan Waiver maharashtra cabinet decision

Crop Loan Waiver maharashtra cabinet decision

esakal

Updated on

Farm Loan Waiver Maharashtra : निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर, राज्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावावर मंगळवारी (ता. २) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीची मोहर उमटण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे या योजनेसाठी वित्तीय तरतूद केली जाणार असली, तरी शासकीय धोरण आणि नाबार्ड व रिझर्व्ह बँकेच्या तांत्रिक नियमांमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला मोठा विलंब होणार आहे. परिणामी, ऐन जूनच्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँका आणि सहकारी सेवा संस्थांकडून नव्या पीक कर्जाचा पुरवठा कसा होणार, याबाबत बँकिंग क्षेत्र आणि शेतकऱ्यांमधून मोठी साशंकता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com