Mumbai Crime News : क्रॉस कनेक्शनचे कन्फ्युजन; कथित दहशतवादी कारवाईचा कॉल चुकून लागल्याचे निष्पन्न

सर्वेश कुमार यांना अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी करून ‘सब तयार हैं ना, मैं १७ तारीख को आ रहा हु, युसूफ को मिल लिया? शक हो गया’, असे बोलून दूरध्वनी बंद करण्यात आला.
cross connections call of alleged terrorist operation was mistaken mumbai police
cross connections call of alleged terrorist operation was mistaken mumbai policeesakal
Updated on

मुंबई : जुहूमधील इस्कॉन मंदिर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला आलेला कथित दहशतवादी कारवाई संदर्भात कॉल हा तपासा अंती क्रॉस कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुहूमधील इस्कॉन मंदिर येथील सर्वेश कुमार यांना बुधवारी सकाळी दूरध्वनीवर कॉल आला. त्यावर अनोळखी व्यक्ती संशीयत चर्चा करीत होती.

सर्वेश कुमार यांना अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी करून ‘सब तयार हैं ना, मैं १७ तारीख को आ रहा हु, युसूफ को मिल लिया? शक हो गया’, असे बोलून दूरध्वनी बंद करण्यात आला. मुंबईवर हल्ल्याबाबततच्या वारंवार बातम्या पाहत असल्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहित दिली.

पोलिसांनीही तात्काळ तपासाला सुरुवात केली. आठ तासांच्या चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीने पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. कॉल करणाऱ्या व्यक्तीला भोपाळला कॉल करायचा होता. मात्र तो चुकून जुहू इस्कॉन टेम्पलचे कुमार प्रवेश यांना लागला. चुकीचा कॉल लागल्याचे समजताच समोरच्या व्यक्तीने कॉल कट केल्याची माहिती समोर आली. मात्र या क्रॉस कनेक्शन आणि चुकीच्या अंदाजामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.