esakal | दाखल्यांसाठी अलिबाग तहसील कार्यालयात गर्दी; सोशल डिस्टन्सिंचा फज्जा 
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग गर्दी.jpeg

लॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेले दाखल्यांची कामे पुर्ण करण्यासाठी नागरिकांची रायगड जिल्हयातील तहसील कार्यालयात लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी लागणारी प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी नागरिकांच्या रांगा दिसून येत आहे. दरम्यान वाढणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लघंन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

दाखल्यांसाठी अलिबाग तहसील कार्यालयात गर्दी; सोशल डिस्टन्सिंचा फज्जा 

sakal_logo
By
प्रमोद जाधव

अलिबाग ः लॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेले दाखल्यांची कामे पुर्ण करण्यासाठी नागरिकांची रायगड जिल्हयातील तहसील कार्यालयात लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी लागणारी प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी नागरिकांच्या रांगा दिसून येत आहे. दरम्यान वाढणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लघंन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

मराठा आरक्षण: उद्या सुनावणी; राज्य सरकारची तयारी कितपत, संभाजीराजेंचा सवाल

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले. जूननंतर लॉकडाऊन हळूहळू शिथील झाल्याने नागरिकांची हळूहळू वर्दळ सुरु झाली. परंतू काहींनी कोरोनाच्या भितीने घरातून बाहेर पडणे टाळले. त्यामुळे जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, शेतकरी दाखले, सातबारा उताऱ्यांवरील नोंदी अशा अनेक प्रकारची कामे रखडली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात हळूहळू कमी होऊ लागल्याने नागरिकांनी सरकारी कार्यालयात रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी गेल्या काही दिवसापासून जिल्हयातील तहसील कार्यांलयांमध्ये धाव घेण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांबरोबरच त्यासाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची नोंदणी करण्याचे काम करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मास्कचा वापर करीत नागरिक नियमांचे पालन करीत आहेत. परंतू काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. 

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही मालिकांच्या अभिनेत्रींची सूटका


लॉकडाऊनमुळे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून दाखल्यांची कामे रखडली होती. कोरोनाची भिती असली तरी दाखले काढणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आवश्‍यक ती काळजी घेत दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात आलो आहे. 
   संदेश औचटकर, नागरिक 
 

 

The crowd of citizens is increasing in the tehsil office in Raigad

( संपादन ः रोशन मोरे)

 

loading image
go to top