मराठा आरक्षण: उद्या सुनावणी; राज्य सरकारची तयारी कितपत, संभाजीराजेंचा सवाल

पूजा विचारे
Monday, 26 October 2020

मराठा आरक्षण प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी होईल. आरक्षणवरील स्थगिती उठवण्याची मागणी यावेळी करण्यात येईल.

मुंबईः मराठा आरक्षण प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी होईल. आरक्षणवरील स्थगिती उठवण्याची मागणी यावेळी करण्यात येईल. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे. तीन सदस्यीय खंडपीठापुढे आरक्षणाची सुनावणी होईल.  तसंच मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभागी झाले. 

मराठा समाजाचा घटक म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. ८५ टक्के गरीब मराठा समाजाची बाजू कोण घेणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

अधिक वाचा- ठाणे जिल्ह्यात मागील आठ दिवसात रुग्णांच्या संख्येत घट

तसंच आमचा लढा ओबीसींविरोधात नसल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. आम्ही किती दिवस शांत बसायचे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.केंद्रावर सगळं ढकलून चालणार नाही असं म्हणत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. राज्य सरकारची कितपत तयारी झाली आहे, असंही त्यांनी विचारलं आहे. 

अधिक वाचा-  दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाणे जिल्ह्यात एक हजार वाहनांची विक्री

५८ मोर्चांची कोणी चर्चा करत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला गृहीत धरु नका, असा इशाराही संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर गेल्या दीड महिन्यात सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलं आहे.

Maratha reservation SC court hearing tomorrow How prepared state government Sambhaji Raje question


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha reservation SC court hearing tomorrow How prepared state government Sambhaji Raje question