मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

प्रशांत कांबळे
Tuesday, 29 December 2020

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीखाली असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रावर नागरिकांची तुडूंब गर्दी दिसून येत आहे. सेवा केंद्राची एकच खिडकी सुरू असल्याने नागरिकांना तासंतास रांगा लावाव्या लागत आहे.

मुंबई  मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीखाली असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रावर नागरिकांची तुडूंब गर्दी दिसून येत आहे. सेवा केंद्राची एकच खिडकी सुरू असल्याने नागरिकांना तासंतास रांगा लावाव्या लागत आहे. त्यामूळे नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्या जात नसून कोविड -19 च्या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कोविड -19 च्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळने, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करने आवश्‍यक आहे. मात्र, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्येच आपले सरकार सेवा केंद्रावर या नियमांचे अल्लंघन केल्या जात आहे. सेवा केंद्रावर फक्त एकच खिडकी सुरू असल्याने, नागरिकांना सकाळ पासूनच रांगा लावाव्या लागत आहे. त्यामूळे दिवसभर तुडूंब गर्दी दिसून येत आहे. 

याच इमारतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागासह अनेक शासकीय कार्यालय आहे. त्यासोबतच सेवा केंद्राच्या बाजुला उपहार गृह सुद्धा आहे. त्यामूळे या इमारती मधील शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन अधिकारी- कर्मचाऱ्यांची ये-जा आहे. त्यासोबतच शहरातील नागरिकांना सुद्धा शासकीय कागदपत्र तयार करण्यासाठी या ठिकाणी यावे लागत असल्याने सेवा केंद्राने खिडक्‍या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

जेष्ठ नागरिकांचे हाल 
राज्य सरकारच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज किंवा कागदपत्र तयार करायची असतात. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावरच यावे लागते. मात्र, एकच खिडकी सुरू असल्याने दिवसभर नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याने अनेकवेळा जेष्ठ नागरिकांना सुद्धा रांगेत उभे राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

 

एका जुन्या इमारतीची दुरूस्ती करून त्याला शेड लावण्यात आले आहे. त्यामध्ये या केंद्राला येत्या आठ दिवसात स्थलांतरण करणार आहे. नविन ठिकाणी नागरिकांच्या सोईसाठी चार खिडक्‍या सुरू केल्या जाणार आहे. 
- राजीव निवतकर,
जिल्हाधिकारी, मुंबई शहर

 

crowd at Mumbai City Collectorate no follow of scial distancing rule

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowd at Mumbai City Collectorate no follow of scial distancing rule