
महाशिवरात्री, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने फुले, पेढे, नारळ आदी व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. तीन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली.
पाली (वार्ताहर) : महाशिवरात्री, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने फुले, पेढे, नारळ आदी व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. तीन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली.
शिवरात्रीपासून पालीत भाविकांची गर्दी होऊ लागली. ती रविवारी (ता. २३) पर्यंत कायम आहे. त्यामुळे येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. हॉटेल, खेळण्यांची आणि शोभिवंत वस्तूंची दुकाने, नारळ, हार, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढे विक्रेते जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात स्थानिक भाज्या घेऊन अनेक विक्रेत्या महिला बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा चांगला धंदा झाला.
कॅनरी चिबूडचे ग्राहकांमध्ये कुतूहल... नक्की काय आहे हे चिबूड
वाहतूक कोंडीचा त्रास
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पाली पोलिस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा : राज्यातील ९१७ शाळा बंद होणार... निर्णयाविरोधात एसएफआय आक्रमक
बल्लाळेश्वराच्या भाविकांसाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंगदेखील आहेत. सुसज्ज स्वच्छतागृह आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
- ॲड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पालीभाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे; मात्र वाकण-पाली-खोपोली मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. हे मार्ग सुस्थितीत झाल्यास भाविकांचा व पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल.
- प्रसाद बावकर, व्यावसायिक