बोर्डी समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

बोर्डी ः दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बोर्डीच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली आहे. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बोर्डीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची वनराई आणि विस्तीर्ण किनारा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. 

गेल्या २० वर्षांपासून बोर्डीला पर्यटन केंद्राचा दर्जा मिळाल्यानंतर बोर्डी परिसरात मोठमोठी हॉटेल्स, रिसॉर्ट विकसित झाल्याने पर्यटकांची राहण्याची आणि भोजनाची उत्तम सुविधा होत आहे. सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये येथील समुद्रात ताजे मासे मिळत असल्याने मांसाहार करणाऱ्या पर्यटकांना बोर्डी गावाचे जास्त आकर्षण आहे. त्याचबरोबर येथील चिकू, चिकूपासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या खरेदीसाठीही पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे भेट देतात. 

रोज २० हजार पर्यटकांची भेट
दिवाळीच्या सुट्टीच्या दरम्यान रोज सुमारे २० हजार पर्यटकांनी बोर्डी, बोरीगाव, चिखले, आगर, नरपड या समुद्रकिनारी वसलेल्या गावात दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटला. त्याचबरोबर बोर्डीपासून दहा किलोमीटरवरील अस्वाली धरणावर आणि तेथील जंगलातही अनेक पर्यटकांनी हजेरी लावली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of tourists on Bordi beach in Palghar