'क्रूझ ड्रग पार्टी' हा खंडणी उकळण्याचा कट; साईलच्या वकिलाचा दावा

aryan khan
aryan khansakal media

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी (cruise drug party) ही खंडणीसाठी रचण्यात आलेला कट (extortion plan) असल्याचा दावा याच प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल याच्या वकिलानं केलाय. प्रभाकर साईल (Prabhakar sail) आज एनसीबी कार्यालयात (NCB Office) हजर झाला होता. तो या प्रकरणात पंच कसा झाला, तसंच पंच म्हणून त्याच्या ज्या 10 कागदांवर सह्या घेतल्यात, त्या त्याच्या मर्जीनं केल्या नसल्याची माहीती देण्यासाठी साईल आज एनसीबी अधिकाऱ्यांना (NCB Authority visit) भेटायला आला होता. हे सगळं मी के पी गोसावीच्या (Kiran Gosavi) संगण्यावरुन केल्याचंही प्रभाकर साहिलचं म्हणणं आहे.

aryan khan
परबांना शंभर कोटी मिळाल्यास एसटीचे विलीनीकरण करतील; प्रसाद लाड यांचा टोला

ज्या दिवशी आर्यन खानला अटक केली तेव्हापासुन पुजा ददलानीला फोन करण्यात आल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं. या प्रकरणात आर्यन खानला अडकवून शाहरुख खानकडून मोठी खंडणी उकळण्याचा प्लान होता, पण किरण गोसावीनं आर्यन खानसोबत घेतलेला सेल्फी व्हायरल झाल्यानं प्रकरण बिघडलं असंही त्यानं सांगितलंय.

25 कोटींच्या खंडणीसाठी कट

हे संपूर्ण प्रकरणात 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात येणार होती. त्यातले 8 कोटी समिर वानखेडे आणि बाकी केपी गोसावी आणि त्याच्या साथीदारांना मिळणार होते. त्यातल्या 50 लाखांचा पहिला व्यवहार करण्यात आला होता. ते 50 लाख प्रभाकर साईलनं के पी गोसावीच्या सांगण्यावरुन घेतल्याचं या चॅटवरुन स्पष्ट होतंय.

प्रभाकर साईल आणि के पी गोसावी यांच्यात झालेलं व्हॉटस अॅप चॅट

3 ऑक्टोबर 2021 वेळ रात्री 8:16

के पी गोसावी - हाजीअलीला जा, सांगितलेलं काम पूर्ण कर आणि घरी ये.

प्रभाकर साईल - हो सर

के पी गोसावी- दाराला कुलूप लाव आणि खिडकीतून चावी हॉलमध्ये फेकून टाक

प्रभाकर साईल - ठिक आहे.

के पी गोसावी - लवकर जा आणि लवकर ये.

क्रूझवरुन 10 लोकांचे फोटो पाठवले.

aryan khan
नवी मुंबई महापालिकेने वाढवल्या कोविड चाचण्या

के पी गोसावीनं प्रभाकरला क्रूझवर सामान्य माणूस म्हणून बसायला सांगितलं होतं. त्याला 10 लोकांचे फाटो व्हॉटसअॅपवर प्रभाकरला पाठवलं होते. हे लोक क्रुझच्या ग्रीन गेटमधून बाहेर पडताना दिसले तर सांग असंही प्रभाकरला सांगण्यात आलं होतं.

व्हॉटस अॅप चॅट आणि व्हॉटसअप कॉल खरे

के पी गोसावी आणि प्रभाकर साईल यांच्यात झालेलं व्हॉटसअप चॅट आणि व्हॉटस अप कॉल मुंबई पोलिसांनी मिळवलं होतं ते खरं असल्याचं प्रभाकर साईलचे वकिल हेमंत नडे यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com