सॅम डिसुझा मुंबई SIT समोर हजर, अन्... | Aryan Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sam Dsouza

सॅम डिसुझा मुंबई SIT समोर हजर, अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात (Cruise drug party case) आज सॅम डिसुझा (sam D'Souza) मुंबई पोलिसांच्या एसआयटी (Mumbai police SIT) समोर झाला. या प्रकरणात पंच प्रभाकर साईलनं (Prabhakar sail) आरोप केल्यानंतर सॅम डिसुझाचं नाव समोर आलं होतं. पार्टीच्या रेडनंतर पुजा ददलानीकडे (pooja dadlani) पैसे मागण्याचं काम सॅम डिसुझानं केल्याचा आरोप प्रभाकर साईलनं केला होता. त्यानंतर एसआयटीनं केलेल्या तपासानुसार के पी गोसावी (kiran Gosavi), सॅम डिसुझा आणि शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानी यंच्याशी फोनवरुन बोलणं झाल्याचं समोर आलं होतं.

हेही वाचा: नवी मुंबई : क्रेडीट कार्डमधून परस्पर ६५ हजाराची खरेदी; गुन्हा दाखल

त्यांच्या फोनचे सीडीआर एसआयटीला मिळाले होते. त्यानंतर एसआयटीनं सॅम डिसुझाला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं होतं, पण त्यावेळी तो चौकशीला हजर झाला नाही. आपल्या आणि आपल्या कुटूंबीयांच्या जिवाला धोका असल्याचंही त्यानं काही दिवसांपुर्वी म्हटलं होतं. पार्टीच्या दिवशी खरंच सॅम डिसुझा पुजा ददलानीच्या संपर्कात होता का, त्या वेळी झालेल्या 50 लाखाचा व्यवहार कसा झाला, सॅम डिसुझाचा नक्की काय रोल होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्याची चौकशी महत्वाची होती.

काही दिवसांपूर्वी अटकेपासुन संरक्षण मिळण्यासाठी सॅम डिसूझानं कोर्टात धाव घेतली होती. आपण शाहरुख खानकडून घेतलेले पैसैही त्याच्या मॅनेजरला परत दिल्याचं त्यानं कोर्टात केलेल्या अर्जात म्हटलं होतं. शाहरुख खानकडून या पार्टीच्या निमीत्तानं 25 कोटीची खंडणी उकळण्याचा डाव असल्याचा आरोप प्रभाकर साईलनं केला होता, त्या व्यवहारातला पहिला हफ्ता 50 लाखाचा होता, ते 50 लाख सॅम डिसुझानं घेऊन प्रभाकरला साईलला दिले होते, प्रकरणानं वेगळं वळण घेतल्यानंतर साईलनं त्या पैशांतले 38 लाख सॅम डिसूझाला परत केले होतें ते सॅम डिसुझानं पुजा ददलानीला परत केल्याची माहीती त्यानं कोर्टात दिली आहे.

loading image
go to top