esakal | Cruise Party : ड्रग्ज प्रकरणात एकूण १६ जण अटकेत; कसून चौकशी सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede

Cruise Party प्रकरणात एकूण १६ जण अटकेत; कसून चौकशी सुरु

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबईतून गोव्याला निघालेल्या कोडोलिया क्रूझवर अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दोन दिवसांपूर्वी आर्यन खानसह तीन जणांना अटक केली होती. यानंतर आज १२ जणांना अटक करण्यात आली असून यांपैकी चार जणांना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली तर इतर चार जणांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. यामध्ये पार्टीचे आयोजन करणाऱ्यांपैकी चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या १६वर पोहोचली आहे.

एनसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अब्दुल कादर अब्‍दुल कयूम शेख (वय ३०), श्रेयस सुरेंद्र नायर (वय २३), मनीष उदयराज दर्या (वय २६), अविन दिनानाथ साहू (वय ३०) या चौघांपैकी श्रेयसला काल रात्री उशीरा तर इतर तिघांना आज सकाळी अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना दुपारी १२.३४ वाजता जे. जे. रुग्णालय वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली. त्यानंतर क्रूझमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन करणाऱ्यांपैकी चार जणांनाही एसीबीनं अटक केली.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना एनसीबीनं अटक केली असून ते सध्या ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत आहेत.

loading image
go to top