
ठाणे : गर्दीने खचाखच भरलेल्या व विरुद्ध दिशांनी जाणाऱ्या दोन उपनगरी गाड्यांना (लोकल) लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने ते खाली कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य नऊजण हे जखमी झाले आहेत. दिवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एका लोहमार्ग पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे.